Ticker

6/recent/ticker-posts

अमेझॉन आता मराठी भाषेत उपलब्ध- वस्तू ऑर्डर करणे झाले अगदी सोपे.


 

नमस्कार मित्रांनो आज या डिजिटल युगात सर्व काही डिजिटल होत चालले , सोबतच आपण देखील डिजिटल होत चाललोय, आजकाल सर्वजण ऑनलाईन खरेदीला महत्त्व देत आहेत. व ई- कॉमर्स साईट चा वापर करत आहे.

                  कोरोणा सारख्या काळात देखील ऑनलाईन खरेदीला अनेकांनी पसंती दिली आहे. घरी बसून काही क्षणात आपण ऑर्डर करू शकतो. व सणासुदीला अनेक ऑफर्स देखील सुरू असतात त्यामुळे कमी किंमतीत देखील हवी ती वस्तू मिळते त्यामुळे लोकांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट या शॉपिंग साईट ला चांगला प्रतिसाद दिला आहे.

                  पण काही लोकांना ऑनलाईन ऑर्डर करणे सोपे वाटत नाही कारण प्रश्न येतो तो भाषेचा, काहींना ENGLISH भाषा जमत नाही. येणाऱ्या सणासुदीच्या ऑफर्स व खरेदी करताना मराठीचा वापर करू शकता असे अमेझॉन ने काही दिवसापूर्वी सांगितले होते, अनेक लोकांची विनंती आईकुन अखेर अश्या लोकांसाठी अमेझॉनने २० तारखेला मराठी व बंगाली या दोन भाषेचा समावेश केला आहे. अनेक दिवसांपासून मराठी संघटना व लोक या साठी प्रयत्न करत होते. आखेर मराठी भाषेचा पर्याय देऊन अमेझॉन ने अनेक अडथळे दूर केले आहे.

                  यासंदर्भात अमेझॉन चे म्हणणे आहे की या नव्या उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ई कॉमर्स भारतात लक्षावधी ग्राहकांसाठी उपलब्ध होत ते वापरणं सोयीस्कर होत आहे असं सांगितलं आहे.

                  त्यामुळे अमेझॉन आता मराठीत भाषेत देखील उपलब्ध असणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या