Ticker

6/recent/ticker-posts

गुंतवणूक कुठे करावी- हे आहेत चांगले पर्याय

मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या काळात अनेक लोक पैसा कमविण्यासाठी धावतानी आपल्याला दिसतात.पण जर आपण फक्त आजचाच विचार केला तर आपले पुढचे आयुष्य हे हलाखीचे जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला आजच गुंतवणूक करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे असलेले पर्याय आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे तर चला बघुया कोणते आहे ते पर्याय.

 🔷 शेअर मार्केट -

 आपल्याला माहीत असेलच की काही पर्षा पूर्वी शेअर मार्केट हा शब्द बऱ्याच लोकांना माहीत ही नव्हता पण गेल्या काही महिन्यांपासून हा शब्द प्रत्येकाच्या तोंडावर आहे. कारण हा एक खूप चांगला परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय आहे. पण या साठी आपल्याला याची माहिती असणे ही खूप महत्वाचे आहे. भविष्याचा वेध घेऊन व अभ्यास करून आपण जर यात गुंतवणूक केली तर आपल्याला निश्चितच भविष्यात चांगला नफा होऊ शकतो. आता खूप लोक याकडे एक चांगला व्यवसाय म्हणून देखील बघू लागले आहेत. व याचा परतावा हा २०% ते खूप जास्त ही असू शकतो. म्हणून आपल्याला कंपनीचा अभ्यास करूनच त्यात पैसा गुंतवणे आवश्यक आहे. 

 🔷 म्यूचल फंड - 

 म्यूचल फंड हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आपल्या पुढे आहे. यालाच SIP (systematic investment plan) असे देखील म्हणतात. की ज्या मध्ये आपण एक रकमी किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून जास्त नफा कमवू शकतो. यात आपल १ वर्ष ते १० वर्षापर्यंत कालावधी साठी पैसे गुंतवू शकतो व याचा मिळणार परतावा हा देखील एक रकमी असतो. या वर मिळणारे व्याज हे तेव्हाच्या बाजार भावा वर अवलंबून असतो. या मुळे आपल्याला कोणता फंड चांगला आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. व चांगल्या सेक्टर चा फंड निवडून त्यात गुंतवणूक करू शकतो.

 🔷 नॅशनल पेन्शन योजना - 

 NPS ही योजना भारत सरकार द्वारे चालवली जाते. की ज्यात कोणताही टॅक्स आकारला जात नाही व यात काही वर्षा साठी प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवून आपण अधिक व्याज मिळवू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण ६० वर्षाचे होऊ त्यानंतर आपल्याला एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून प्रत्येक महिन्याला भेटू शकते. याचा फायदा आपल्याला आपल्या वृद्ध काळात नक्कीच होऊ शकतो. 

 🔷 एफडी- 

 पैसा कुठे गुंतवायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण काही माहिती नसताना आपला पैसा कसा सुरक्षित ठेवायचा हे मात्र माहीत नसते तर अश्या लोकांसाठी एफडी हा एक चनगका पर्याय आपल्या समोर आहे. यालाच fixed deposit असेही म्हणतात. कारण यात कोणतीही जोखीम नसते. आपण आपल्या कडील काही पैसे यात एक रकमी काही वर्षाच्या मुदतीत गुंतवून त्यावर ६ ते ७ टक्के इतका परतावा मिळवू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे यावर बाजार भावा नुसार कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे हा एक खूप सोपा पर्याय आहे. 

 🔷 रिअल इस्टेट - 

 रिअल इस्टेट म्हणजे मालमत्तेत गुंतवणूक करणे. म्हणजे जागा , प्रॉपर्टी हे खरेदी करून काही वर्षांनंतर विकून आपण यातून चांगला परतावा मिळवू शकतो व यात पैश्याची जोखीम ही खूप कमी आहे. व आज घेतलेली जमीन आपण काही दिवसानंतर विकली तर निश्चितच घेतलेल्या किमती पेक्षा मिळणारा परतावा हा जास्तच असतो. या मध्ये कोणताही अभ्यास कर्णयची गरज नसते.ब भारतात हा पर्याय खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. व यात जास्त ज्ञान लागत नसल्याने कोणताही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतो. 

 🔷 सोने व चांदी - 

 मित्रांनो आपण सोने खरेदी करतो पण आपल्याला आवडते म्हणून. पण हा पण एक गुंतवणुकीचा पर्याय आहे कारण १० वर्षा आधीची किंमत व आजची किंमत यातला फरक जर आपण बघितला जर हा देखील एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे हे आपल्याला नक्कीच समजेल. या मुळेच खूप लोक यात गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. व यात डिजिटल पद्धतीने सुधा गुंतवणूक करू शकतो म्हणजे सोने चोरी होण्याची भीती राहत नाही.

 🔷 बॉण्ड गुंतवणूक - 

 जेव्हा आपल्याला पैश्याची गरज पडते तेव्हा आपण कोणाकडून तरी पैसे घेतो. पण जेव्हा सरकारला काही पैश्याची गरज असते तेव्हा ते बॉण्ड्स विकून पैसा उभा करतात. या बॉण्ड्स ला लेटर ऑफ डेबिट असेही म्हणतात. कारण हे पात्राच्या स्वरूपात असते. व या पत्रावर याची अंकित मूल्य किंवा त्या बॉण्ड ची किंमत देखील लिहलेले असते. तुम्हाला यावर ८% इतके व्याज मिळू शकते. 

 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या