प्रत्येक वेळेसच Samsung लोकांसाठी अतिशय चीप व कमी वजन असणारे, व दमदार मोबाईल लॉन्च करून करोडो ग्राहकांना आकर्षित करत आहे. सोबत जास्त वेळ चालणारी battery बॅकअप आणि कॅमेरा मुळे जास्त लोक Samsung ला महत्व देत आहेत.
आज Samsung ने त्यांच्या लोकप्रिय Galaxy m51 ची पुढची नवी आवृत्ती म्हणजेच Galaxy M52 5G हा भारतात सादर केला असून यामध्ये अनेक धडाकेबाज फिचर्स दिले गेले आहेत.
यामध्ये 6.7" sAmoled डिस्प्ले , Snapdragon 778g हा फास्टेस्ट प्रोसेसर , 120 Hz रिफ्रेश रेट, 64 mp ट्रीपल कॅमेरा सेटअप आणि 32mp फ्रंट कॅमेरा दिला आहे. या मोबाईल ची बॅटरी 5000mAh दिली गेली असून मोबाईल लवकर चार्ज व्हावा म्हणून या सोबत 25w फास्ट चार्जिंग सुविधा सोबत असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा मोबाईल येत्या 3 ऑक्टोंबर पासून महणजेच येणाऱ्या अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये विक्री साठी उपलब्ध असणार आहे. या मध्ये सध्या तरी 8gb +128gb हा एकच पर्याय उपलब्ध असणार आहे. व याची किंमत 34999/ जरी असली तरी हा फोन नवीन ग्राहकांना फक्त 26999/ इतक्या किंमतीत मिळणार आहे.


0 टिप्पण्या
आपण दिलेल्या अभिप्रया धन्यवाद.