Ticker

6/recent/ticker-posts

ई- कॉमर्स म्हणजे काय? - आता घरी बसून पैसा कमवणे झाले सोपे.


 ई-कॉमर्स बहुतेकांनी हे नाव तर आइकले असेलच कारण आज जगात सर्वात जास्त बोलबाला या ई- कॉमर्स चा दिसून येतो. हि या जगाची उद्याची उद्योग संधी आहे, आणि प्रत्येकालाच याची माहिती असणे गरजेचे आहे.मित्रांनो खास म्हणजे आपण याद्वारे वस्तू विकत तर घेऊ शकतो त्या सोबतच पैसे देखील कमवू शकतो. 


आपण रोजच कोणाचं कोणाच्या तोंडातून फ्लिपकार्ट, Amazon बद्दल तरी ऐकले असेलच, आपल्यापैकी बर्‍याच जणांनी तर या वेबसाइट्स वरून खरेदीही केली असेल म्हणूनच ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेट वर केली खरेदी किंवा विक्री. त्या खरेदी विक्री मध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा असू शकते म्हणजेच फोन, टी-शर्ट किंवा बुक्स यासारखे एखादे उत्पादन असू शकते किंवा सिनेमा/ विमानाचे तिकीट काढण्यासारखी एखादी सेवा असू शकते.


म्हणजेच फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वर इंटरनेट द्वारे एखादे उत्पादन खरेदी करणे म्हणजे ईकॉमर्स आहे किंवा BookMyShow वर चित्रपटाचे तिकीट खरेदी करणे हे देखील एक ईकॉमर्स आहे.


पण यात जरासे प्रकार देखील असतात. तर ते आपण बघू

ईकॉमर्स व्यवसायाचे मुख्य चार प्रकार आहेत आणि ते खालिलप्रमाणे,


१. ग्राहक ते व्यवसाय ईकॉमर्स (Consumer to Business (C2B)):

जेव्हा एखादी व्यक्ती आपली उत्पादने किंवा सेवा, व्यवसाय किंवा संस्थेला विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला ग्रहाला ते व्यवसाय ईकॉमर्स असे म्हणतात.



२. व्यवसाय ते व्यवसाय ईकॉमर्स (Business to Business (B2B)): 

दुसरा प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय .जेव्हा एखादा व्यवसाय दुसर्‍या व्यावसायाकडून एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करतो त्या वेळेस त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला व्यवसाय ते व्यवसाय ईकॉमर्स ( B2B) असे म्हणतात.



३. ग्राहक ते ग्राहक ईकॉमर्स (Consumer to Consumer (C2C)):

जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे एखादे उत्पादन किंवा सेवा विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला ग्राहक ते ग्राहक ईकॉमर्स असे म्हणतात



४. व्यावसायिक ते ग्राहक ईकॉमर्स (Business to Consumer (B2C)):

जेव्हा एखादा व्यवसाय/संस्था एखाद्या व्यक्तीस एखादी वस्तू किंवा सेवा विकते त्या प्रकारच्या ईकॉमर्स ला बी ते सी ईकॉमर्स म्हणातात. म्हणजेच व्यवसाय ते ग्राहक ईकॉमर्स.

ह्या मध्ये ऑनलाईन पोर्टल वर विविध सेलर्स असतात जे आपल्याला सेवा किंवा वस्तू विकत असतात म्हणजेच व्यवसाय ते ग्राहक इ- कॉमर्स BEST HEADPHONE IN 2021



आता आपण ईकॉमर्समध्ये पैसे कसे कमवायचे या याबद्दल चर्चा करू.

मित्रांनो आपल्याला माहीत असेल फ्लिपकार्ट , अमेझॉन या कंपन्या सणासुदीच्या काळात विशेष सूट व डिस्काउंट ऑफर देतात.व या काळात खूप लोक ऑनलाईन खरेदी देखील करतात. तर आपण या कंपन्यांच्या affiliate मार्केटिंग मध्ये सहभागी होऊन हजारो रू कमवू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त प्रॉडक्टची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. व त्यांनी ती वस्तू जर खरेदी केलीत कंपनी त्यातला काही भाग तुम्हाला देते. असे तुम्ही पैसे देखील कमवू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

 सोबतच तुम्ही तुमच्या कडील वस्तू देखील यावे ऑनलाईन विकू शकता. सध्या संपूर्ण भारतभरात १ लाखाहून अधिक ऑनलाईन विक्रेते अमेझॉनवर/फ्लिपकार्ट वर विक्री करतात आणि ही संधी अशी आहे कि येथून आपण संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात आपली वस्तू पोहचवू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या