Ticker

6/recent/ticker-posts

Laptop चा स्पीड Slow झालाय? असा करा एकदम फास्ट

 


आज आपण बघतो की सर्वच लोक ऑनलाईन झालेत व व्यवसाय देखील. प्रत्येक व्यक्ती यासाठी आपल्या आपल्या सोयीनुसार लॅपटॉप घेतो. पण काही दिवसांनी जस जसे त्याचे स्टोरेज कमी होते त्याच सोबत त्याचा स्पीड देखील कमी होतो. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात.


लॅपटॉपचा प्रोसेसिंग स्पीड स्लो झाला, तर अनेक काम रखडतात. लॅपटॉप स्लो झाल्यामुळे कधी-कधी खूप मनस्ताप होतो, विशेषतः जेव्हा तुम्ही काही महत्त्वाची कामं करत असता आणि लॅपटॉप हळू चालत असल्यामुळे कामाचा वेग कमी होतो. अशा स्थितीतही काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. तुमच्या लॅपटॉपच्या कमी झालेल्या स्पीडमुळे तुम्हीही वैतागला आहात का? काम करत असताना अचानक लॅपटॉपचा स्पीड कमी होतो आणि त्या वेळी खूप राग येतो; पण टेन्शन घेऊ नका. आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढण्यास मदत होईल. या टिप्स नेमक्या काय आहेत, ते जाणून घेऊ या.

हे करून बघा 

तुमच्या लॅपटॉपचा स्पीड कमी झाला असेल तर सर्वांत आधी लॅपटॉप रीस्टार्ट करा. लॅपटॉप रीस्टार्ट केल्याने त्याची कॅशे मेमरी क्लिअर होते आणि लॅपटॉपचा स्पीड वाढतो.


• लॅपटॉपमध्ये ब्राउझरचा वापर करीत असताना कमीतकमी टॅब्ज उघडा. ब्राउझर विंडोमध्ये तुम्ही जितक्या जास्त टॅब्ज उघडाल, तितका तुमच्या लॅपटॉपची रॅम आणि प्रोसेसरवर जास्त भार येईल. त्यामुळे, ज्या टॅब्जची गरज नाही, त्या बंद करा. अनावश्यक जास्त टॅब्ज उघडून ठेवू नका. असं केल्याने तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडवर चांगला परिणाम होतो.

• काही स्टार्टअप अॅप्स कालांतराने लॅपटॉपमध्ये तयार होतात. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या स्पीडवर परिणाम होतो. कारण हे स्टार्टअप अॅप्स तुमच्या लॅपटॉपचे रिसोर्सेस खर्च करतात; पण तुम्हाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे अनावश्यक स्टार्टअप अॅप्स काढून टाका.

लॅपटॉपमधून अनावश्यक प्रोग्राम्स अनइन्स्टॉल करणं हा लॅपटॉपचा स्पीड वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही आवश्यक नसलेले प्रोग्राम्स काही काळासाठी अनइन्स्टॉल करण्याचा विचार करू शकता. हे प्रोग्राम्स, गेम्स किंवा कामाशी संबंधित इतर कोणतीही सॉफ्टवेअर्स असू शकतात. असं केल्याने तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढतो

आपण जे अँप रोज वापरत नाही ते अँप काढून टाका, त्याने देखील तुम्हाला स्पीड चांगला भेटण्यासाठी मदत होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या