नमस्कार मित्रांनो आपला ही मोबाईल खराब झालाय का ?
झाला असेल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा मोबाईल होईल दुरुस्त ते ही अगदी मोफत म्हणजे एक रुपया ही न देता. वाचून जरा नवलच वाटत असेल पण हे खरे आहे.
One Plus इंडिया आपल्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय घेऊन आला आहे.
जर आपल्या मोबाईल डिस्प्ले ला ग्रीन लाईन आली असेल.
डिस्प्ले संबंधित काही खराबी झाली असेल तर आपण त्यांच्या स्टोअर ला जाऊन आपला मोबाईल अगदी मोफत दुरुस्त करून घेऊ शकता. आपल्या कडून या साठी एक रुपया ही शुल्क आकारला जाणार नाही.
आणि हो अजून एक महत्वाचे म्हणजे जर तुमच्या मोबाईल चा डिस्प्ले त्या स्टोअर मध्ये त्या वेळेस भेटला नाहीतर वन प्लस कडून आपल्याला त्या डिस्प्ले च्या किमतीचे कूपन मिळणार आहे की जे देऊन आपण आपला मोबाईल इतर दुकानातून ही दुरुस्त करून घेऊ शकणार आहे.
हे कूपन देखील आपल्याला अगदी मोफत मिळणार आहे.
अनेक मोबाईल कंपनी भारतात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव नवीन पर्याय सोबत अनेक मोबाईल सादर करीत आहे. त्यातच हा असा पर्याय ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याचा असणार आहे. आणि त्याच बरोबर One Plus ला देखील जास्तीत जास्त ग्राहक मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल.

0 टिप्पण्या
आपण दिलेल्या अभिप्रया धन्यवाद.